न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०९ मे २०२३) :- दुकानात येवुन फिर्यादीला शिवीगाळ केली. १५०० रुपये दरमहा हप्ता मागितला. नाही दिला तर तुला धंदा करुन देणार नाही, अशी धमकी दिली.
तसेच फिर्यादीच्या दुकानाशेजारी असलेल्या भारत फुट वेअर व महालक्ष्मी ट्रेडर्स या दुकानांच्या मालकांनासुद्धा शिवीगाळ करुन त्यांच्याकडेही आरोपीने हप्ता मागितला.
फिर्यादी प्रदिप अशोककुमार मोटवानी (रा. रिव्हररोड, पिंपरी) यांनी आरोपी गणेश शिरसाठ (वय अंदाजे ३० वर्षे रा. आंबेडकर कॉलनी, पिंपरी) यांच्या विरोधात फिर्यादी दिली आहे. पिंपरी पोलिसांनी ५०७/२०२३ भा.द.वि कलम ३८५, ५०४, ५०६ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
















