न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०९ मे २०२३) :- हिंजवडी वाहतूक विभागा अंतर्गत पदमभूषन चौक, हिंजवडी येथे फिर्यादी वाहतूक पोलीस हे नाकाबंदी करित होते. (दि. ८) रोजी दूपारी १२.०५ वाजेच्या सूमारास होंडा सिटी कार वरिल आरोपी चालक याने फिर्यादी यांना सार्वजनिक रोडवर अश्लील शिवीगाळ केली.
त्यांच्या सरकारी गणवेशाची कॉलर पकडुन लाथाबुक्यांनी मारहाण केली. सरकारी गणवेशाचे दोन बटन तसेच नेमप्लेट तोडली. हिंजवडी वाहतुक विभागाचे पोहवा यांनी आरोपी होंडा सिटी कारवरील चालक अमृता शाम केसवड (रा. खराबवाडी, चाकण) याच्या विरोधात हिंजवडी पोलीस ठाण्यात ५९८/२०२३ भादवि ३५३, ३३२, ५०६, ५०४ प्रमाणे गुन्हा दाखल केला असून आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.
















