न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० मे २०२३) :- लग्न झाल्यापासून घरातील छोट्या छोट्या कारणावरुन महिला फिर्यादी बरोबर आरोपींनी वाद घातला. फिर्यादीला वाईट वाईट शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी कमरेच्या बेल्टने मारहान करीत त्यांना जखमी केले. आरोपी व सह आरोपी यांनी फिर्यादीचा गळा दाबून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. फिर्यादीला शारिरिक व मानसिक त्रास दिला. तसेच सह आरोपीने फिर्यादीला घरामध्ये जबरदस्तीने १५० उठाबशा काढायला लावल्या, असे फिर्यादीत नमूद आहे.
हा प्रकार (दि. ९) रोजी १.३० वाजता आदर्शनगर, देहूरोड येथे घडला.
महिला फिर्यादीने आरोपी जावेद मुबारक मुल्ला, मुबारक मुल्ला, महिला आरोपी, मोसीन मुबारक मुल्ला, महिला आरोपी (रा. आदर्श नगर) यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
देहुरोड पोलिसांनी २८०/२०२३ भादवी कलम ३०७, ४९८ (अ), ३२३, ५०४, ५०६, ३४ नुसार गुन्हा दाखल केला आहे.
















