न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० मे २०२३) :- चिंचवडच्या दळवीनगर येथील सोपानराव भोईर उड्डानपुलाखाली (दि. ९) रोजी दुपारी ३:३० च्या दरम्यान गुन्हा करण्याच्या उद्देशाने शहरातून तडीपार केलेल्या दोन गुन्हेगारांनी स्वतः जवळ लोखंडी सुरा व कोयता बाळगला.
याबाबत पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाला याबाबत माहिती मिळाली. दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. चिंचवड पोलिसांनी २१४ / २०२३ आर्म अॅक्ट ४ (२५), महाराष्ट्र पोलीस अधिनियमकलम १४२, ३७ (१), (३) सह १३५ नुसार दोघांवर गुन्हा दाखल केला आहे.
अविनाश ऊर्फ तोत्या शिवाजी पांढरकर (वय २४ वर्ष, रा. सुभाष पांढरकरनगर, आकुर्डी), प्रफ्फुल राजेंद्र ढोकणे (वय २४ वर्षे रा. आनंदपार्क लेन नंबर १, थेरगाव फाटा, डांगेचौक, चिंचवड) असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
















