न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ मे २०२३) :- पथकासह अतिक्रमण कारवाई करीत असताना फिर्यादीला महीला आरोपीने कारवाईस विरोध केला. अतिक्रमण पथकातील बंदोबस्ताकरीता हजर असलेल्या महीला पोलीस या आरोपी महीलेस समजावुन सांगत असताना त्यांनी अतिक्रमण कारवाईत अडथळा आणला.
महिला पोलीस अंमलदारांना अर्वाच्य शिवीगाळ करुन धक्काबुक्की केली. महीला पोलीसाचा हात पिरगाळला. तसेच हातास ओरखडुन जखमी केले. पथकातील सर्व स्टाफला वाईट शिवीगाळ करुन धक्काबुक्की करीत सरकारी कामात अडथळा निर्माण केला, असे फिर्यादीत नमूद आहे.
ही घटना (दि. १७) रोजी दुपारी २.४० ते २.५५ वाजताच्या दरम्यान कृष्णानगर चौक ते साने चौक रोड, चिखली येथे घडली. फिर्यादी महेंद्र जागोबाजी चौधरी (रा. रहाटणी) यांनी महिला आरोपीच्या विरोधात फिर्याद दिली आहे. चिखली पोलिसांनी ३२९/२०२३ भादंवि कलम ३५३, ५०४, प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.