न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ मे २०२३) :- मोबाईल फोनवरील टेलीग्राम अॅपवर फिर्यादी मेसेज पहात होते. दरम्यान आरोपीने Urbi patel आयडि ओपन करुन आयडीवरुन फिर्यादीस https//uieu8.online या नावाने लिंक दिली. त्या लिंकवर एक टास्क फिर्यादीला दिसला. त्यामध्ये काही हॉटेलची नावे होती. त्यापैकी एक हॉटेलला फिर्यादीने लाईक केले. फिर्यादीला लगेच त्यांच्या अकाऊंटवर १५० रुपये जमा झाले.
नंतर सह आरोपीच्या मोबाईल नंबरवरून २००० रुपये आयसीआयसीआय बँक अकाऊंटवरुन फिर्यादीच्या अकाऊंटवर २,८०० रुपये जमा झाले. अशाप्रकारे आरोपींनी फिर्यादीला वेगवेगळे टास्क दिले. त्याप्रमाणे फिर्यादीने लाईक केले. दरम्यान फिर्यादीला बँक अकाउंटवर पैसे भरण्यास सागितले. त्यानंतर फिर्यादीस sandeep p. या नावाने मोबाईल फोनवर क्रिएट झालेले अकाऊंटवर क्लीक करणेस सांगीतले.
दरम्यान त्यातून फिर्यादी यांची आरोपींनी एकुण १,००,००० रुपयांची फसवणुक केली, असे फिर्यादीत नमूद आहे. हा प्रकार (दि. ११) रोजी दुपारी २.३० च्या सुमारास चिखली लिंकरोड, जाधववाडी येथे घडला.
फिर्यादी संदिप आनंदराव पाटील यांनी आरोपी उर्बी पटेल, मोहित बीसवाल (मोबाईल नंबर ८४४८६७०२९९), रोषण बिंदवाल, दर्शन प्रोडक्ट फुड यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे. चिखली पोलिसांनी ३३०/२०२३ भादवी कलम ४२० नुसार गुन्हा दाखल केला आहे.