न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ मे २०२३) :- फायनान्स कंपनीकडून दोघांनी गृहकर्ज घेतले. गृहकर्जाची (दि.०५/१०/२०२०) नंतर परतफेड न करता, गृहकर्जाचे हप्ते थकवले.
चोलामंडलम फायनान्स कंपनीने वेळोवेळी तोंडी सूचना आणि कायदेशीर नोटीसांची बजावणी करुन त्यांना नोटीस कालावधीची रितसर सूट देवून देखील त्यांनी थकविलेल्या गृहकर्जाचे हप्ते न भरता जाणिवपुर्वक फ्लॅट मिळकतीचे सिल केलेले कुलूप तोडून, फ्लॅट मिळकतीत अनधिकृत प्रवेश करून फलॅट मिळकतीत अनधिकृतरित्या अतिक्रमण केले आहे. तसेच या फ्लॅटचा वैयक्तिक कारणासाठी आरोपी वापर करत आहेत, असे फिर्यादीत म्हटले आहे.
हा प्रकार (दि. २४/०४/२०२३) रोजी दिघी, गायकवाडनगर येथे घडला. महिला फिर्यादीने आरोपी महिला, संतोष जालिंदर शिर्के (रा. दिघी) यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे. दिघी पोलिसांनी २१८/२०२३ भा.दं.वि कलम ४४८, ३४. प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.