न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ मे २०२३) :- नोकरी आणि लहान मुलाचा सांभाळ तसेच इतर किरकोळ कारणावरुन फिर्यादीच्या मुलीचा आरोपींनी शारीरीक व मानसिक छळ केला. तिला मारहाण केली. त्या त्रासाला कंटाळुन फिर्यादीच्या मुलीने राहत्या घरात गळफास घेवुन आत्महत्या केली आहे, असे फिर्यादीत म्हटले आहे.
ही घटना (दि. ०९/१२/२०१७ पासुन दि. १७/०५/२०२३ पर्यंत) वेळोवेळी रहाटणी येथे घडली.
फिर्यादी संतोष गजानन दुर्गाडे (रा. हडपसर) यांनी आरोपी पती श्रीकांत सावता ढोक (तापकीर मळा, रहाटणी), महिला आरोपी यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे. वाकड पोलिसांनी ४८३/२०२३ भा.द.वि. कलम ३०६, ४९८ (अ), ३२३,३४ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.