- पस्तीस वर्षीय व्यक्तीचा जागीच मृत्यू; कंटेनर चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ मे २०२३) :- टाटा कार कंटेनर हा आरोपी चालकाने निष्काळजीपणे सार्वजनिक रोडवर पार्क केला होता. गाडी हॅण्ड ब्रेक न लावता उभी करुन ठेवल्याने ती रिव्हर्स आली. दरम्यान विकास सोनवणे (वय ३५ वर्ष रा. पिंपरी) हे चहा पिऊन रस्त्याच्या पलीकडे पायी जात असताना पाठीमागून आलेल्या गाडीने त्यांना धडक दिल्याने ते खाली पडले. त्यांच्या डोक्यावरुन पाठीमागील चाक गेल्याने ते गंभीर जखमी झाले. त्यांचा मृत्यू झाला. आरोपी वाहनचालक त्यांच्या मृत्युस कारणीभुत झाला आहे, असे फिर्यादीत म्हटले आहे.
हा अपघात (दि. १८) रोजी सकाळी ९.३० च्या सुमारास मोरया लॅक सेंटर समोर, स्पाईन रोड, उड्डाणपुलाच्याखाली, क्रांतीचौक, मोशी येथे घडला. फिर्यादी सुर्यकांत सोनवणे (नेहरुनगर, पिंपरी) यांनी आरोपी टाटा कार कंटेनर गाडी नंबर एन एल /०१/के/२०५१ वरील चालक सुबोध नारायण शिरोळे (वय ५६ वर्ष रा. बो-हाडेवाडी, मोशी) यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
एमआयडीसी भोसरी पोलिसांनी २१०/२०२३ भादवि ३०४ (अ) मोटार वाहन कायदा कलम ११९/१७७ नुसार गुन्हा दाखल केला आहे.