न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ मे २०२३) :- जमिन खरेदी विक्रीचा फिर्यादी यांचा व्यवसाय आहे. त्यातून आरोपीने त्यांच्याशी व्यवहारीक जवळीक निर्माण केली. दोघांमध्ये आर्थिक व्यवहार झाल्याने एकमेकांवरील विश्वास बसला.
दरम्यान आरोपीने फिर्यादी यांना ताम्हीणी घाटात १० एकर जमिन आलेली आहे. ती फार स्वस्त मिळणार आहे. त्यामुळे त्यांना रोज तेथे शेतक-यांशी बोलायला जावे लागते, असे कारण सांगत फिर्यादीकडून १५,००,००० रुपये किंमतीची महिंद्रा थार गाडी आरोपीने नेली. गाडी परत न केल्याने त्याच्याकडे फिर्यादीने वारंवार विचारणा केली. आरोपीने गाडीचा अॅक्सीडेंट झाला आहे, असे खोटे सांगीतले.
त्यानंतर गाडी दिघी येथे गहाण ठेवल्याचे सांगुन वाहन पुन्हा सोडवुन देतो, तोपर्यंत गाडीचे हफ्ते भरतो असे सांगितले. मुंबई येथील महिंद्रा शोरुममधुन फोन आल्यावर सह आरोपीकडे वाहन असल्याचे फिर्यादीला समजले. त्याला फोनवरुन वाहनाबाबत विचारता तो सुध्दा वेगवेगळी कारणे देत वाहनाबाबत माहिती देण्यास टाळत आहे, असे फिर्यादीत म्हटले आहे.
हा प्रकार एप्रिल २०२२ ते आजपर्यंत थेरगाव येथे घडला. विजय महादु केदारी (रा. थेरगाव) यांनी आरोपी आशिष गायकवाड (रा. च-होली), मोबाईल क्रमांक ६२६१५३१४७० धारक इसम यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे. वाकड पोलिसांनी ४८५ / २०२३ भा.द.वि.कलम ४०६, ४१७, ४२०, ३४ नुसार गुन्हा दाखल केला आहे.