- सापळा रचुन टोळी जेरबंद; गुन्हे शाखेची कामगिरी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ मे २०२३) :- ‘लखनौ सुपर जॉइन्ट विरुध्द कोलकत्ता नाईट राईडर्स’ या आयपीएल मॅचवर ऑनलाईनद्वारे वेगवेगळया वेबसाईटवर आयडीव्दारे ऑनलाईन क्रिकेट व इतर सट्टा आरोपी खेळत व खेळवित आहेत, अशी माहिती गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंधक कक्षाला मिळाली.
हिंजवडी पोलीस स्टेशन हददीत सापळा रचुन आरोपींना पकडले. आरोपीच्या ताब्यातून ९०,००० रुपयांचे दोन लॅपटॉप, ३,९०,००० किंमतीचे १३ मोबाइल फोन, १२०० चे स्ट्रिक फायबर वायफाय, ४ नोटबुक असा एकुण ४,८१,२०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.
वैभव बाबाराम डिक्कर, सचिन गंगाराम आजगे, विकास कैलास लेढे, ओमकार बिरा भांड, आशिष निरांजण देशमुख, महेश परमेश्वर काळे, राम भानु शाली, विकास रायसिंग चव्हाण, प्रकाश भगवानदास तेजवाणी यांच्या विरुद्ध हिंजवडी पोलीस स्टेशन येथे गुरनं ६३५ / २०२३ भादंवि कलम ४२०,३४ महाराष्ट्र जुगार कायदा कलम ४ (अ).५ व भारतीय टेलीग्राफ अॅक्ट कलम २५ (क) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. गुन्हयाचा पुढील तपास हिंजवडी पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक गाढवे हे करत आहे.
ही कामगिरी पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, पोलीस सहआयुक्त डॉ. श्री. संजय शिंदे, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उप-आयुक्त (गुन्हे), स्वप्ना गोरे मॅडम, सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे), डॉ. प्रशांत अमृतकर यांच्या मार्गदर्शनाखाली अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंधक कक्षाचे पोलीस निरीक्षक देवेंद्र चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक प्रदिपसिंग सिसोदे, पोलीस उपनिरीक्षक विजय कांबळे, पोलीस अंमलदार सुनिल शिरसाठ, गणेश कारोटे, वैष्णवी गावडे व तांत्रिक विश्लेषण विभागाचे पोलीस अंमलदार नागेश माळी यांनी केली आहे.