न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ मे २०२३) :- देव दर्शनासाठी अॅक्टिवावरून फिर्यादी आणि त्यांची दोन मुलं जात होती. त्यावेळी पुढे जाणा-या गाडीचा पाठीमागील दरवाजा उघडून फिर्यादीला लागला. त्यामुळे फिर्यादी व त्यांची मुले गाडीसह रोडवर पडली.
अचानक समोरुन भरधाव वेगाने येणा-या वाहनाचे मागील चाक फिर्यादीच्या तीन वर्षांच्या मुलाच्या अंगावरून गेल्यामुळे मुलाचा मृत्यु झाला. आरोपी वाहनचालक त्यास कारणीभूत झाला आहे. तसेच दोन्ही वाहनांचे चालक वाहनासह घटनास्थळी न थांबता निघून गेले. हा अपघात (दि. २१) रोजी सकाळी ९.४५ च्या सुमारास हनुमान मंदिर, आकुर्डी गावठाण चौक, पुरोहित मिठास दुकानासमोर, आकुर्डी येथे घडला.
फिर्यादी आदेश विष्णू विचारे (रा .प्राधिकरण, निगडी) यांनी आरोपी महिद्रा सुप्रो आणि बोलेरो पिकअप या दोन्ही गाड्यांचे चालक यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे. निगडी पोलिसांनी ३१८/२०२३ भा.दं.वि. कलम २७९.३०४(अ), मो. वा. कायदा कलम १८४, ११९/१७७,१३२(१)(क) अन्वये दोघांवर गुन्हा दाखल केला आहे.













