न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ मे २०२३) :- खोटी कागदपत्रे बँकेत सादर केली. तसेच शपथेवर खोट्या मजकुराचे हानीरक्षण बंधपत्र (INDEMNITY BOND) दिले.
नाव साधर्म्य असलेल्या बँकेचे दुसरे खातेधारक मयत यांच्या नावे असलेली मुदत ठेव व रिकरिंग खात्यावरील एकूण रक्कम रु. ४,३१,७७१ फसवणुकीने प्राप्त करून बँकेची फसवणूक केली, असे फिर्यादीत म्हटले आहे.
हा प्रकार (दि. १८/१०/२०२१ ते २०/०४/२०२३) दरम्यान घडला. फिर्यादी राहुल चंद्रकांत नाईक यांनी आरोपी रमाशंकर बाबुराम विश्वकर्मा (रा. दिघी) यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे. भोसरी ४४५/२०२३, भा.दं.वि. कलम ४१९, ४२०, ४६५, ४६७, ४७१ प्रमाणे आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.