न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ मे २०२३) :- पांढ-या रंगाची मारुती कंपनीची चार लाख रुपये किमतीची स्विफ्ट गाडी अज्ञात चोरटयाने चोरुन नेली आहे.
चोरीची ही घटना (दि. २०) रोजी रात्री ११:३० ते (दि. २१) रोजी सकाळी ६:०० च्या दरम्यान ग्रिन्स पार्क होसिंग सोसायटी, मोरेवस्ती, चिखली येथील सार्वजनिक रस्त्यावर घडली आहे.
फिर्यादी राम पोपट क्षिरसागर यांनी आरोपी अज्ञात इसम याच्या विरोधात फिर्याद दिली आहे. चिखली पोलिसांनी ३४३/२०२३ भादवि कलम ३७९ नुसार गुन्हा दाखल केला आहे.