न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ मे २०२३) :- तुला बघुन घेतो, अशी धमकी देणाऱ्या आरोपीचे फिर्यादीच्या मामीसोबत असलेले प्रेमसंबंध फिर्यादी व त्यांच्या नातेवाईकांनी उघड केले होते. त्यामुळे आरोपी हा त्यांच्या मागावर होता.
फिर्यादी हे शाळेसमोर त्यांच्या मित्रासोबत गप्पा मारत थांबले होते. त्या ठिकाणी दुचाकीवरून येऊन आरोपी यांनी हातात लोखंडी कोयते घेऊन फिर्यादीला शिवीगाळ केली. ये थांब असे म्हणून त्यांच्या अंगावर धावून गेले, असे फिर्यादीत म्हटले आहे.
ही घटना (दि. २१) रोजी सायंकाळी ६.२३ वा. सुमारास गिता माता स्कुलसमोर, चिंचवड येथे घडली आहे. फिर्यादी अर्जुन नामदेव मोरे यांनी आरोपी सागर संभाजी शिंदे, गणेश शेट्टी यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
पिंपरी पोलिसांनी ५५५/२०२३ भादवि कलम ३५२, ५०४, ५०६, ३४ आर्म अॅक्ट कलम ४ (२५) नुसार आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून मुख्य आरोपीला अटक केली आहे.