न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ मे २०२३) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कायदा विभागाचे उपायुक्त चंद्रकांत इंदलकर यांची सह आयुक्तपदी पदोन्नती झाली आहे. महापालिका आस्थापनेवर सह आयुक्तपद शासन मंजूर आहे.
सह आयुक्त आशादेवी दुरगुडे या ३१ मार्च २०२३ रोजी सेवानिवृत्त झाल्या. त्यानंतर हे रिक्त पद पदोन्नतीने भरण्यासाठी पदोन्नती समितीची सभा झाली. पदोन्नती समितीने पदोन्नतीपूर्व उपायुक्त पदावरील इंदलकर यांची शैक्षणिक अर्हता, अनुभव कालावधी, सेवाज्येष्ठता, गोपनीय अहवाल, संगणक अर्हता, भत्ता व दायित्व, आणि शिस्तभंग विषयक कारवाई इत्यादी सेवाविषयक तपशील पडताळून पाहिला.
सह आयुक्त पदाचे सर्व निकष पूर्ण करत असल्याने इंदलकर यांना पदोन्नती देण्यास मान्यता देण्यात आली आहे. इंदलकर यांनी यापूर्वी क्षेत्रीय अधिकारी आणि समाज विकास विभागात कार्य केले आहे.