- भोसरीत वाहतूक पोलिसाला दमदाटी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ मे २०२३) :- टिव्हीएस ज्युपिटर दुचाकीवरील दोघांनी मोठमोठ्याने आरडा ओरड करुन ‘तुम्ही आमची पावती का केली, मी तुम्हाला बघुन घेतो’, अशी दमदाटी वाहतूक पोलिसांना केली. सह आरोपीने फिर्यादी वाहतूक पोलीस आणि पोलीस निरीक्षक यांची स्वताःच्या मोबाईलमध्ये शुटिंग करुन सोशल मिडीयावर व्हायरल करण्याची धमकी दिली.
त्याचबरोबर मी कोण आहे हे तुम्हाला दाखवतोच, असे म्हणुन त्यांच्या अंगावर धावुन जात सरकारी कामात अडथळा आणला. तसेच पोलीस स्टेशनमध्ये सुध्दा अरेरावीची भाषा वापरली.
ही घटना (दि. २४) रोजी १२.१९ च्या दरम्यान नाशिक फाटा, भोसरी येथे घडली. भोसरी पोलिसांनी ४५०/२०२३, भा.दं.वि. कलम ३५३, ३४ नुसार आरोपी अश्वदीप पोपटलाल तारळकर (गव्हाणे वस्ती, भोसरी), महिला आरोपी यांच्या विरोधात गुन्हा केला असून दोघेही पोलिसांच्या ताब्यात आहेत.