न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ मे २०२३) :- युरोनेट सर्व्हिसेस कंपनीने प्रोव्हाईड केलेल्या एचडीएफसी बँकेच्या एटीएम रुममध्ये एका अनोळखी इसमाने काचेच्या उघड्या दरवाजावाटे आत प्रवेश केला.
एटीएमचे डोअर पॅनल, हुड लॉकशी टेस्टर व दगडाच्या साहयाने छेडछाड करून एकुण ६,००० रुपयांचे नुकसान करुन एटीएममधील कॅश चोरी करण्याचा प्रयत्न केला.
हा प्रकार (दि २४) रोजी २.२५ च्या सुमारास चिखली-मोशी लिंकरोड, जाधववाडी, चिखली येथील एचडीएफसी बँकेच्या एटीएममध्ये घडला.
फिर्यादी उमेश लक्ष्मण लामखडे यांनी आरोपी अनोळखी इसमाच्या विरोधात फिर्याद दिली आहे. चिखली पोलिसांनी ३४९/२०२३ भादवि कलम ३८०, ५११, ४२७ नुसार गुन्हा दाखल केला आहे.