न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ मे २०२३) :- कोणताही परवाना नसताना दोघांनी स्वतःजवळ लोखंडी गावठी पिस्टल व दोन २ जीवंत काडतुसं जवळ बाळगले. चिंचवड पोलिसांना याबाबत माहिती मिळाली.
चिंचवडेनगर येथील वाल्हेकरवाडी रस्त्यावरील हॉटेल कोल्हापुरच्या बाजुला (दि. २४) रोजी दुपारी ४.०५ च्या दरम्यान कारवाई करीत दोघांना अटक केली.
चिंचवड पोलिसांनी दोघांच्या विरोधात २३२/२०२३ आर्म अॅक्ट ३ (२५), महाराष्ट्र पोलीस अधिनियम ३७ (१), (३) सह १३५ नुसार गुन्हा दाखल केला आहे. किरण रमेश गालफाटे, रोहन जयदिप चव्हाण (दोघेही राहणार मंगळवार पेठ, पुणे) असे अटक आरोपींची नावे आहेत.