न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ मे २०२३) :- राजीनामा दिलेला असतानाही आरोपीला कंपनीचा डाटा, जो कंपनीच्या दृष्टीने अति महत्वाचा आहे. त्याचा कंपनीच्या नफा/तोटयावर परीणाम होऊ शकतो, याची जाणिव होती. त्याचा गैरवापर करण्याच्या उद्देशाने आरोपी कंपनीत आला.
एक्झिट फॉर्म भरण्याकरीता आरोपीने ऑफिशियल लॅपटॉप घेतला. एक्झिट फॉर्म च्या निमित्ताने कंपनीची गोपनिय माहिती स्वतःच्या मेल आयडीवर बेकायदेशिरपणे इंटरनेट च्या माध्यमातुन चोरली. त्यामध्ये कन्सोलीडेटेड फाईल ऑफ व्हेरिएबल कॉस्ट तसेच कंपनीचे विविध प्रॉडक्टस, डेव्हलप पंप मॉडेल्स यांची गोपनिय माहिती होती. तसेच ही माहिती कोणाला कळु नये याकरीता सदरची हस्तांतर केलेली माहिती आरोपीने डिलीट करून टाकली आहे, असे फिर्यादीत नमूद आहे.
हा प्रकार (दि २९/०४/२०२३) रोजी दुपारी ०१.३० ते दुपारी ०२.१५ च्या दरम्यान केएसबी लि. जुना पुणे-मुंबई मार्ग, पिंपरी येथे घडला. फिर्यादी नितिश दत्तात्रय कुलकर्णी यांनी आरोपी चंद्रकांत बाळासाहेब कड याच्या विरोधात फिर्याद दिली आहे. पिंपरी पोलिसांनी ५५८/२०२३ भादवि ४२०, ४०८, २०१ सह माहिती तंत्रज्ञान अधिनियम क.६५,६६० प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.