- उन्नति सोशल फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ. कुंदा भिसे यांची आयुक्तांकडे मागणी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ मे २०२३) :- पिंपळे सौदागर येथील जरवरी हाऊसिंग सोसायटी समोरील रस्त्यावर भरधाव वाहनांमुळे अपघात घडत आहेत. अपघात रोखण्यासाठी याठिकाणी गतीरोधक तयार करावेत, अशी मागणी उन्नति सोशल फाउंडेशन अध्यक्षा डॉ कुंदा भिसे यांनी केली आहे.
यासंदर्भात आयुक्त शेखर सिंह यांच्याकडे निवेदन देण्यात आले आहे. त्यात डॉ कुंदा भिसे यांनी म्हटले आहे की, पिंपळे सौदागर येथील जरवरी हाऊसिंग सोसायटी समोरील रस्त्याचे काम पूर्ण झाले आहे. सिमेंट कॉक्रिटचा रस्ता असल्यामुळे वाहणे सुसाट वेगाने धावत असतात. वाहनांना वेग मर्यादा नसल्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. परवा दुचाकीचा अपघात झाल्याने एका महिलेला प्राण गमवावे लागले. तर, दुचाकीची धडक बसून एक युवक गांभीर जखमी झाला.
या मार्गाने पायी चालत जाणाऱ्या नागरिकांची संख्या देखील मोठी आहे. विशेषता सोसायटी समोरील पि के स्कुल असून त्या ठिकाणी शाळेतील मुले रस्ता ओलांडून जात असतात व ज्येष्ठ नागरिक याठिकाणी असलेल्या विठाई वाचनालयात येत असतात. या भरधाव वाहनांमुळे त्यांना जीव मुठीत घेऊन रस्ता ओलांडावा लागतो. नागरिकांच्या सुरक्षेसाठी जरवरी हाऊसिंग सोसायटी समोरील रस्त्यावर गतिरोधक बसवावेत. त्यामुळे वाहनांचा वेग मर्यादित राहून संभाव्य अपघाताची संख्या रोखण्यात यश येईल, अशी मागणी डॉ कुंदा भिसे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.












