न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ मे २०२३) :- फोनवरून फिर्यादीकडे फूकट कपडे मागितले. ते देण्यास नकार दिल्याने आरोपी हा साथीदारासह सायंकाळी फिर्यादीच्या दुकानावर आला. फिर्यादीला हाताने मारहाण केली. फिर्यादीच्या पार्टनरला शिविगाळ केली.
कोयता दाखवुन फिर्यादीच्या दुकानातुन दोन जिन्स पॅन्ट व तिन कॅज्युअल शर्ट जबरदस्तीने चोरी केले. फिर्यादीला धमकी देवून पार्टनरकडून गुगल पेद्वारे एक हजार रुपयांचा हप्ता घेवुन गेले आहेत, असे फिर्यादीत म्हटले आहे. ही घटना (दि. २५) रोजी सायं ५.३० वाजता वाडी मेन्स वेअर या कपड्याच्या दुकानात, विकासनगर, किवळे येथे घडली.
फिर्यादी रोहन राजेश देशमुख यांनी आरोपी रफिक शेख, राकेश तेलगु यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे. देहुरोड पोलिसांनी ३०७/२०२३ भादवि कलम ३८६, ३८७,३४ सह आर्म अॅक्ट कलम ४(२५) क्रि. लॉ अमेटमेंट ३ व ७ नुसार आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे.