न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ मे २०२३) :- चाळीवरुन आरोपी व फिर्यादी यांच्यामध्ये जुने वाद आहेत. त्याबाबत कोर्टात केस चालु आहे. दरम्यान फिर्यादीच्या चाळीच्या कौलारु घराचे कौल दोन मजुर काढत होते. फिर्यादी हे तिथे गेले असता आरोपी यांनी फिर्यादी यांना शिवीगाळ केली.
फिर्यादी यांचा हात पिरगळुन हातावर व नाकावर कौल मारुन गंभीर जखमी केले. फिर्यादीचे नाक फॅक्चर आहे. तसेच फिर्यादीच्या नातुला जिवे मारण्याची धमकी दिली आहे, असे फिर्यादीत म्हटले आहे. हा प्रकार (दि. २४) रोजी सकाळी ११.०० च्या दरम्यान नेहरूनगर, पिंपरी येथे घडला.
७२ वर्षीय महीला फिर्यादीने आरोपी महीला, महीला आरोपी, सचिन संजय तहसिलदार, राहुल संजय तहसीलदार यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे. पिंपरी पोलिसांनी ५६३/२०२३ भादंवि कलम ३२५, ३२३, ५०४, ५०६, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.