न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ मे २०२३) :- टेलीग्राम चॅनेल, मोबाईल आणि वेबसाईटद्वारे कमिशन देण्याचा बहाणा केला. हॉटेलला रेटींग देण्याकरिता टास्कच्या माध्यमातून अधिक परतावा देवुन फिर्यादीचा आरोपीने विश्वास संपादन केला. त्यानंतर फिर्यादी यांना पैसे भरण्यास भाग पाडुन त्यांची एकुण १०,९५,०८२ रुपयांची आर्थिक फसवणुक केली आहे.
हा प्रकार (दि. १० ते दि. १७) रोजी केशवनगर, चिंचवड येथे घडला.
फिर्यादी गणेश मुकुंद अमृतकर यांनी आरोपी PAYAL व CS CHANNEL 113 टेलेग्राम चॅनेल , मोनं. ९७२१९४६५०९ व वेबसाईट Travelka-top.cc/login च्या विरोधात फिर्याद दिली आहे. चिंचवड पोलिसांनी २३६ / २०२३ भा.दं. वि. कलम ४१९, ४२० माहीती तंत्रज्ञान कायदा कलम ६६ (डी) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.