न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ मे २०२३) :- सार्वजनिक रस्त्यावर दोन गटात भांडण सुरू होती. एका गटातील चौघेजण व दुस-या गटातील पाच ते आठजण प्रॉपर्टीच्या वादातून सार्वजनिक रस्त्यावर मोठमोठ्याने आरडा ओरडा, शिवीगाळ करून ऐकमेकांची गच्ची धरून झोंबाझोंबी करीत होते.
लोकांची गर्दी जमवून सार्वजिनक शांततेचा भंग करत होते. हा प्रकार (दि २४) रोजी दुपारी ३.३५ वा. क्रांती चौक, पवार गल्ली, नेहरूनगर, पिंपरी येथील सार्वजनिक रोडवर घडला.
पिंपरी पोलिसांनी ५६२/२०२३ भादवि कलम १६० नुसार महिला आरोपी, महिला आरोपी, संकेत संतोष उबाळे, किरण योगेश वाघ व दुसऱ्या गटातील महिला आरोपी, महिला आरोपी, सचिन संजय तहसिलदार, राहुल संजय तहसिलदार यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.