- सर्सास करतात इडली डोश्याच्या व्यवसाय; काळेवाडीत एकावर जिवघेणा हल्ला…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ मे २०२३) :- मित्राच्या नातेवाईकांमध्ये मयत झाल्याने त्यांच्या अस्थिविसर्जनासाठी मंदार सुनिल कुसे (रा, गिरगाव, मुंबई) काळेवाडी येथे आले होते. (दि. २५) रोजी ००:३० वा. च्या सुमारास ते काळेवाडीतील राहुल रेस्टॉरंट येथे जेवणाचे पार्सल ऑर्डर घेण्यासाठी बाहेर थांबले होते. त्यावेळी ५ ते ६ अनोळखी इसमांनी अचानक त्यांच्या जवळ येऊन अज्ञात कारणावरुन डोक्यात कोयत्याने वार केला. त्यात ते जखमी झाले. याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात ५०३/२०२३ भादंवि कलम ३०७,५०४,१४१,१४३,१४४, १४७, १४८, १४९ आर्म अॅक्ट ४,२५ महा. पो. का. क. ३७ (१) (३) सह १३५, क्रिमीनल ॲमेंटमेंट अॅक्ट ३,७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.
वाकड पोलीस स्टेशनने दोन वेगवेगळे तपास पथक तयार करुन तपास सुरु केला. फिर्यादीकडे अधिक चौकशी केली असता मित्रासोबत ते त्यांच्या दाजीसोबत ज्योतीबानगर, काळेवाडी येथे आले होते. (दि. २४) रोजी अस्थिविसर्जन झाल्यानंतर ज्ञानेश्वर बोरकर यांचे मित्र मोहन चंदे, बिट्ट ऊर्फ संघर्ष चंदनशिवे असे सर्व कामानिमीत्त एकत्रित फिरले होते. काही दिवसापुर्वी बिट्टू ऊर्फ संघर्ष चंदनशिवे याच्या वडीलांना दक्षिण भारतीय मुलाने किरकोळ कारणांवरुन धक्काबुक्की केली होती. या दक्षिण भारतीय मुलाचा तापकीर चौक, काळेवाडी येथे इडली डोसा विकण्याचा व्यवसाय आहे. रात्री १०:३० च्या सुमारास बिट्टू ऊर्फ संघर्ष चंदनशिवे याने या दक्षिण भारतीय मुलास त्याच्या वडीलांना धक्का बुक्की केल्याबाबत जाब विचारला. योग्य ती समज दिली होती. त्यामुळे त्याचा राग मनात धरुन दक्षिण भारतीय ५ ते ६ इसमांनी कोटेश्वर पेट्रोलपंपासमोर येऊन बिट्टू ऊर्फ संघर्ष चंदनशिवे याचा शोध घेतला. फिर्यादी तेथे उभे असल्याचे पाहून व फिर्यादी बिट्ट ऊर्फ संघर्ष चंदनशिवे यांच्यासोबत फिरताना त्याने पाहिले असल्याने फिर्यादीवर हल्ला केला.
आरोपींचा तांत्रिक व पारंपारीक पध्दतीने शोध घेत असताना आरोपी अरुमुगम सुब्बयाह (वय २५ वर्षे रा. जगताप नगर, डी मार्टचे मागे भाडयाने, थेरगाव; मुळ रा. ४९ पील्लायर को व्हील रोड, मलुकारकुरीची, तिरुनलवेली राज्य तमिळनाडु) याला थेरगाव मधून अटक करण्यात आली. त्यावेळी त्याचे ताब्यात ०२ किलो २५ ग्रॅम गांजा मिळून आल्याने वाकड पोलीस येथे गु.र.नं. ५०४ / २०२३, एन.डी.पी.एस. अॅक्ट कलम ८(क),२०(ब)(ii)(ब) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सापळा रचून शिताफीने पोलिसांनी उर्वरित ५ गुन्हेगार शंकर अरुनाचलम, रमेश अरुनाचलम, वानमामलाई मुथ्थया, इसकीपांडी सुब्बलह, मायाकन्नन सुब्रमणी (सर्व रा. तामिळनाडु) या आरोपी यांना गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे. दाखल गुन्ह्याचा पुढील तपास राजेश मासाळ, पोलीस उप निरीक्षक, वाकड पोलीस ठाणे करीत आहेत.
अटक ६ आरोपींपैकी ४ आरोपींच्यावर तिरुनेलवेल्ली, तामिळनाडु येथे गंभीर गुन्हे दाखल असून आरोपी शंकर अरुनाचलम याच्यावर १६ गुन्हे, आरोपी वानमामलाई मुथ्थया याच्यावर ७ गुन्हे, आरोपी इसकीपांडी सुब्बलह याच्यावर १५ गुन्हे व आरोपी अरुमुगम सुब्बयाह याच्यावर ०६ गुन्हे असे भादंवि कलम ३०२, ३०७,३९९,३९७,३८७ आर्म अॅक्ट प्रमाणे गंभीर गुन्हे दाखल आहेत. आरोपी यांच्या मूळ गावी दोन गटात वैमनस्य असून त्यातूनच गुन्हे दाखल असून सदर वैमनस्यामध्ये संरक्षण मिळण्यासाठी पुणे येथे राहून इडली डोसाचा व्यवसाय करीत असल्याचे निष्पन्न झाले आहे.
सदरची कारवाई विनयकुमार चौबे, पोलीस आयुक्त, डॉ. संजय शिंदे सह. पोलीस आयुक्त, वसंत परदेशी, अपर पोलीस आयुक्त, डॉ. काकासाहेब डोळे पोलीस उप आयुक्त, परि-२, पद्माकर घनवट, सहा. पोलीस आयुक्त देहुरोड विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली गणेश जवादवाड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, रामचंद्र घाडगे पोलीस निरीक्षक गुन्हे – २, सपोनि.संतोष पाटील, पोउपनि सचिन चव्हाण, पोउपनि राजेश मासाळ, सपोफौ. बिभीषण कन्हेरकर, सपोफौ.बाबाजान इनामदार, सपोफौ.राजेंद्र काळे,पोहवा. वंदु गिरे, पोहवा संतोष बर्गे, पोहवा.स्वप्निल खेतले, पोहवा. अतिश जाधव, पोहवा.प्रमोद कदम, पोहवा. संतोष महाजन, पोना. अतिक शेख, पोना. विक्रांत चव्हाण, पोना. प्रशांत गिलबीले, पोशि. अजय फल्ले, पोशि . तात्या शिंदे, पोशि.स्वप्निल लोखंडे, पोशि. सौदागर लामतुरे, पोशि. विनायक घारगे, पोशि रमेश खेडकर, पोशि. कौतेंय खराडे, पोशि. भास्कर भारती, तसेच परिमंडळ – ०२ कडील पोशि पंडीत यांनी मिळुन केली आहे.