- गुन्हे शाखा युनिट एकने डोंगरात लपून बसलेल्या आरोपीच्या आवळल्या मुसक्या…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०२ जून २०२३) :- जुन्या भांडणाची खुन्नस धरून आरोपीने फिर्यादीचा भाऊ आणि दोघा पाहुण्यांना ‘बस स्टॉपवर उभा राहिचे नाही’, असा दम देत त्यातील एकाला धक्काबुक्की करून शिवीगाळ केली. त्यावेळी फिर्यादी आणि त्यांचे आई वडील तेथे गेले असता आरोपीने फिर्यादीशी बाचाबाची अनं दमदाटी करत घरातून छोटी बंदुक आणुन फिर्यादी यांना जिवे ठार मारण्याच्या उददेशाने फिर्यादीवर रोखुन निशाना धरला. त्यांना जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला.
‘माझ्या नादी लागु नका मी एकएकाला गोळया घालीन’ अशी धमकी दिली. हा प्रकार (दि. १) रोजी दुपारी १.०० च्या सुमारास बहुळ गावच्या हददीत चाकण शिक्रापुर रोडवरील बस स्टॉपवर घडला. फिर्यादी हनुमंत राजाराम वाडेकर यांनी आरोपी अशोक गोविंद वाडेकर (रा. बहुळ) याच्या विरोधात फिर्याद दिली. चाकण पोलिसांनी ४९८/२०२३ भादवी का क ३०७, ३२३, ५०४, ५०६, भारतीय शस्त्र अधिनियम ३/२५ सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७ (१) (३) चे उलंघन १३५ नुसार आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल केला.
दरम्यान पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट एकने डोंगरात लपून बसलेल्या आरोपीला अटक केली आहे. त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेला गावठी कट्टा आणि छऱ्याची बंदूक असा एकूण २४५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करीत आरोपीला चाकण पोलिसांच्या हवाली केले आहे.












