न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०२ जून २०२३) :- नाबालिक असल्याचे माहित असूनही आरोपी यांनी आपसांत संगनमत करून पिडीत महिलेचे सह आरोपीशी लग्न लावून दिले. पिडीतेच्या आरोपी नवऱ्याने त्यांच्यासोबत मनाविरुद्ध इच्छा नसताना बळजबरीने ५ ते ६ वेळा शरिरसंबंध ठेवले. पिडीतेस शिवीगाळ करून हाताने मारहाण केली आहे, असे फिर्यादीत नमूद आहे.
हा प्रकार (दि.०२/०१/२०२३ ते दि. १७/०५/२०२३) दरम्यान पारवडी बारामती व नंतर पिंपरीगाव येथे घडला. पिडीत महिला फिर्यादीने आरोपी महिला आरोपी, मावस भाऊ रोहन राजेंद्र कांबळे, महिला आरोपी, मामा आजोबा लालासो कांबळे, मुलगा रोहित सुरज भोसले, महिला आरोपी, मुलाचा मित्र तुषार गायकवाड, महिला आरोपी, मुलाचा भाऊ प्रेम ऊर्फ राहुल सुरज भोसले, महिला आरोपी, मावशीचा नवरा शिवाजी साळवे, महिला आरोपी, महिला आरोपी, मुलाच्या मावशीची तीन मुले (त्यांची नावे माहित नाही) यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
पिंपरी पोलिसांनी ५१३/२०२३ भादवी कलम ३७६ (३), ३५४, ३५४ (अ), ३२३, ५०४, लैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण अधिनियम २०१२ कलम ४, ८, १७ तसेच बालविवाह प्रतिबंधक अधिनियम कलम ९, १०, ११ प्रमाणे गुन्हा दाखल करीत एकाला अटक केली आहे.
















