न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०३ जून २०२३) :- खोलीमध्ये फिर्यादी कीर्तनकार व त्यांचे मित्र झोपलेले होते. खोलीच्या उघडया दरवाज्यावाटे चोरटयाने आत प्रवेश केला. खोलीमधील चार्जिंगला लावलेले ५६,५०० किंमतीचे एकुण ५ मोबाईल चोरी करून नेले आहेत.
ही घटना (दि. २) रोजी रात्री १.०० ते सकाळी ७.०० च्या दरम्यान कोयणा खोरा धर्मशाळा, गोपाळपुरा, आळंदी येथील खोलीमध्ये घडली.
फिर्यादी विशाल रमेश पिंपळे यांनी आरोपी अक्षय उमाशंकर पाटील याच्या विरोधात फिर्याद दिली. आळंदी पोलिसांनी १४५/२०२३ भादवि कलम ३८० प्रमाणे गुन्हा दाखल करीत आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.












