न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०३ जून २०२३) :- पोलिसांच्या आदेशाचे उल्लंघन करून आरोपीने स्वतःजवळ गावठी पिस्तुल मॅग्झीनसह व २ जिवंत काडतुसे विनापरवाना बेकायदेशीररित्या अनाधिकारने जवळ बाळगले. याबाबत पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या गुंडा विरोधी पथकाला माहिती मिळाली.
त्यांनी आरोपीला (दि. २) रोजी सायं ५. १० च्या सुमारास पुनावळेतील कोयते वस्ती चौकात असलेल्या एस. के. वडेवाले या दुकानासमोरून शिताफीने ताब्यात घेतले. त्याच्याकडून ५१,००० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
उमेश चंद्रकांत केदारी (वय २७ वर्षे, रा. गणेश बेलेरोजा सोसायटी, कोयतेवस्ती, पुनावळे) असे अटक आरोपीचे नाव आहे. रावेत पोलीस ठाण्यात २२८/२०२३ भारतीय हत्यार का. कलम ३.२५ महा. पो. अॅ. कलम ३७ (१) (३) सह १३५ अन्वये त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
त्याच्यावर मावळ तालुक्यातील कामशेत पोलीस ठाण्यात आणखी एक गुन्हा दाखल आहे. आरोपीला न्यायालयात हजर करून पोलीस कास्टडी घेण्यात आली आहे.












