न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ जून २०२३) :- कायमस्वरुपी काम देण्याच्या बहाण्याने फिर्यादीशी ओळख वाढवली. फिर्यादीचा मोबाईल नंबर घेतला. त्यावर वारंवार संपर्क साधला. फिर्यादी कपडे बदलत असताना गडबडीत आरोपीचा कॉल लागल्याने आरोपीच्या मोबाईलवर रेकॉर्डींग झाले. आरोपीने ते व्हायरल करण्याची फिर्यादी यांना धमकी दिली. फिर्यादी यांना आरोपीने त्याच्या घरी बोलावुन घेत फिर्यादीसोबत त्यांच्या मनाविरुध्द जबरदस्तीने शरीर संबंध केले. तसेच त्या व्हिडीओचा आरोपीने फायदा घेऊन आरोपीने त्याच्या मित्रासोबत शरीर संबंध ठेवण्यास भाग पाडले. दोन्ही आरोपीतांनी वेळोवेळी फिर्यादीस व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देवून आळी पाळीने शरीरसंबंध प्रस्थापित केले, असे फिर्यादीत नमूद आहे.
हा प्रकार मार्च ते १२/०६/२०२३ पर्यंत आरोपीच्या राहत्या घरी तसेच मेडिकल दुकानासमोरील मोकळया जागेत घडला. महिला फिर्यादीने आरोपी शशिकांत कदम, रमेश गोपीनाथ सुरवसे यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
चिखली पोलिसांनी ३८६/२०२३ भा.दं.वि. कलम ३५४, ३७६ (ड), ५०६ प्रमाणे गुन्हा दाखल करीत आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.