न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ जून २०२३) :- भाऊजीने आरोपीच्या मनात फिर्यादीच्या बहिणीचे अज्ञात इसमांबरोबर अफेअर आहे, असे खोटे नाटे भरुन दिले. फिर्यादीचे आरोपी भाऊजी यांनी तिच्या चारित्र्यावर संशय घेवून तिचा शारीरिक व मानसिक त्रास दिला. तिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले, असे फिर्यादीत म्हटले आहे.
हा प्रकार (दि. १५/०५/२०२३) पासून (दिनांक ०९/०६/२०२३) पर्यंत शिवनेरी कॉलनी, रहाटणी व समता कॉलनी, रहाटणी येथील मयताच्या राहत्या घरी घडला.
फिर्यादी मारुती सुभाष देवणे यांनी आरोपी शिवलिंग संग्राम बोधने, शिवप्रसाद ऊर्फ प्रसाद बेल्लाळे, महिला आरोपी यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे. वाकड पोलिसांनी ५६७ / २०२३ भा.द.वि. कलम ३०६,३४ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.












