- तिचे डोके भिंतीवर जोराने आपटुन नराधमं बापाने खून केला…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४ जून २०२३) :- तीन वर्षांची मुलगी घरात रडत होती. त्याचा राग आल्याने मुलीच्या आरोपी वडीलाने तीच्या पोटावर बुक्यांनी मारहाण केली. तसेच तिला दोन्ही हातांनी उचलून तिचे डोके भिंतीवर जोराने आपटुन तिला जीवे ठार मारले आहे, असे फिर्यादीत म्हटले आहे.
हा प्रकार (दि. १२) रोजी सकाळी १०.०० वा. भैरवनाथ मंदीर शेजारी, चिंचोली, देहूरोड येथे घडला. देहुरोड पोलिसांनी ३३२/२३ भा.द.विकलम ३०२ नुसार गुन्हा दाखल करीत आरोपी महादेव नारायण गायकवाड याला बेड्या ठोकल्या आहेत.