न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४ जून २०२३) :- चिंचवड रेल्वे स्टेशन जवळील मालधक्का येथील ब्रिजखाली फिर्यादी त्यांच्या मावस भावासह बसले होते. त्यावेळी आरोपी दोघे तिथे अॅक्टीवा गाडीवरुन आले. त्यातील सह आरोपीने एकाला ब्लेड दाखवुन ५०० रुपयाची मागणी केली. त्यांनी पैसे दिले नाहीत.
त्याचा राग मनात धरून दोघांना आरोपींनी प्रथम शिवीगाळ करुन पेवर ब्लॉक व विटांनी मारण्यास सुरवात केली. डाव्या खांदयाजवळ विट लागली. तसेच पेवर ब्लॉक व विटांनी डोक्यावर मारहाण करुन गंभीर दुखापत केली, असे फिर्यादीत म्हटले आहे. ही घटना (दि. १२) रोजी रात्री ९.४५ च्या सुमारास कंपाउंड जवळ, मालधक्का, दवाबाजार चिंचवड रेल्वे स्टेशन जवळ, चिंचवड येथे घडली.
फिर्यादी रणजीत राजु शेट्टी यांनी आरोपी तुषार ऊर्फ सनी सुरेश गायकवाड, आदेश ऊर्फ भैया बप्पा ऊर्फ सुरेश गायकवाड यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे. निगडी पोलिसांनी ३४८/२०२३ भादंवि कलम ३०७,३८५, ५०४, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करीत दोघांना अटक केली आहे.