न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४ जून २०२३) :- BITCOIN MONEY DOUBLING नावाच्या अकाउंटवरुन फिर्यादीला मॅसेज आला. त्यांना ” ४५ दिवसात गुंतवलेले पैसे डबल करुन देण्याचे अमिष दाखवुन, त्यांचा विश्वास संपादन केला. आरोपीने फिर्यादी यांना एकुण ६४,१३२ रुपये ऑनलाईन पद्धतीने दिलेल्या अकाउंटवर पाठविण्यास भाग पाडले. त्यांनतर अधिक रक्कम जमा करण्यास सांगितली. जमा रक्कमेबाबत फिर्याने काही डॉक्युमेंट मागीतले असता आरोपीने टाळटाळ केली. त्यामुळे फिर्यादी यांना संशय आला. आरोपीने फिर्यादीची फसवणुक केली, असे फिर्यादीत म्हटले आहे.
हा प्रकार (दि. १/०२/२०२३ ते दि. २/०२/२०२३) दरम्यान फिर्यादी हे राहत्या घरी असताना मोबाईलवर घडली. फिर्यादी नरेंद्र अर्जुन सिंग यांनी आरोपी ARJUN SIR MONEY DOUBLING टेलीग्राम अकाउंट धारक व मोबाईल नंबर ७५६८७१८२०५ चा वापरकर्ता इसमाच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
भोसरी पोलिसांनी ४९८/२०२३ भा.द.वि. कलम ४०६, ४२० सह कलम ६६ ड माहिती तंत्रज्ञान अधिनियमप्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.