न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ जून २०२३) :- पत्नी व भावजय या मुलांना शाळेतून आणायला गेल्या. तेव्हा फिर्यादीची मुले घरात होती. त्यावेळी घरी आलेल्या अनोळखी महिलेने मुलांना ‘तुझी आई कुठे आहे’ असे विचारले. मुलांनी ‘आई शाळेत गेली आहे’ असे सांगितले.
तेव्हा अनोळखी आरोपी महिला फिर्यादीच्या घरात घुसली. घरातील ५०,००० किमतीचे १७ ग्रॅम वजनाचे सोन्याचे व चांदीचे दागीने हे कपाट उघडुन चोरी करून निघून गेली, असे फिर्यादीत म्हटले आहे.
हा प्रकार (दि. १५) रोजी दुपारी १.५६ वाजता वनश्री नगर, तळेगाव स्टेशन, तळेगाव दाभाडे येथे घडला. नंदकिषोर किशन कावळे यांनी आरोपी अनोळखी महिलेच्या विरोधात फिर्याद दिली आहे. तळेगाव दाभाडे पोलिसांनी २६९/२०२३ भा.द.वि. कलम ३८० नुसार गुन्हा दाखल केला आहे.