न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ जून २०२३) :- फोर्ट सिटी डेव्हलपर्स तर्फे घेण्यात आलेल्या जमिनीबाबत कायदेशिर बाबी पूर्ण करण्यासाठी फिर्यादीने आरोपीला कलमुखत्यारपत्र / पॉवर ऑफ अॅटर्नी केले होते. आरोपीने त्याचा गैरवापर केला.
मालमत्तेची हुकमत त्याच्याकडे असताना त्याने जमीन गट क्रमांकामधील ११० गुंठे जमिन वेगवेगळया सात जणांना विकली. तसेच आणखी एका गट क्रमांकामधील ६७९/१२ मधील ८६ गुंठे जमिन वेगवेगळया दोन लोकांना विकली आहे. आरोपीने एकूण १९६.९ गुंठे क्षेत्र फिर्यादी यांच्या संमतीशिवाय विकुन फिर्यादीची २.५९ कोटी रुपयांची फसवणूक केली आहे, असे फिर्यादीत म्हटले आहे.
हा प्रकार सन २४/०९/२००४ ते १५/०७/२०२२ दरम्यान कुरळीगाव, ता-खेड, जि पुणे या ठिकाणी घडला. फिर्यादी राजेश शंकरलाल काकाणी यांनी आरोपी शंभू धोंडीराम पवार याच्या विरोधात फिर्याद दिली आहे. चाकण पोलिसांनी ५४२ / २०२३ भादवि कलम ४०९, ४२० नुसार आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे.