न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ जून २०२३) :- ‘मला बावधन या ठिकाणी जायचे आहे;, असे सांगुन आरोपी हा फिर्यादीच्या रिक्षात बसला. दरम्यान रिक्षा काही अंतरावर गेल्यावर आरोपीने फिर्यादीला थांबवण्यास सांगीतले.
फिर्यादीला आरोपीने ज्युस पिण्यास दिला. त्या ज्युसमध्ये काही तरी गुंगीकारक पदार्थ मिसळुन फिर्यादीला पिण्यास दिला. फिर्यादी त्या नशेत असताना त्यांची गळ्यातील दोन तोळे वजनाची ६०,००० रुपये किंमतीची चैन रिक्षात बसलेल्या आरोपीने काढून घेत पळुन काढला, असे फिर्यादीत म्हटले आहे.
हा प्रकार (दि. १२) रोजी सकाळी ११.०० ते २.३० वाजता सानेवाडी, औंध, बावधन येथे घडला. फिर्यादी शेटी हनुमंता धोत्रे, रिक्षा चालक यांनी आरोपी अनोळखी इसम याच्या विरोधात फिर्याद दिली आहे. हिंजवडी पोलिसांनी ७१७/२०२३ भा.दं.वि. कलम -४०६, ३२८ नुसार गुन्हा दाखल केला आहे.