न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ जून २०२३) :- अवैद्यरित्या विनापरवाना मागणी केलेल्या १४,००० रुपये किंमतीच्या ५ तलवारी व ४,००० रुपये किंमतीच्या २ कुकारी यांचा आरोपींनी शस्त्रसाठा केला. पोलिसांच्या हत्यार बंदीच्या आदेशाचे उल्लंघन केले.
याप्रकरणी (दि. १५) रोजी सायं ६.०० च्या दरम्यान दिघी पोलिसांनी डी.टी. डी.सी. कंपनी, डायमॅनिक कॅलोजीस्टीक, तालेरानगर, दिघी-आंळदी रोड येथे कारवाई करून तिघांना ताब्यात घेतले.
त्यांच्यावर दिघी पोलीस ठाण्यात २६६/२०२३ भारतीय हत्यार कायदा कलम ४ (२५), सह महाराष्ट्र पो. कायदा कलम १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी हरियाणाचा मोबाईलधारक, भारत नामदेव कोल्हे, विक्रम श्रीकृष्ण डेमसे, निरंजन अनिल ओदवंत यापैकी तिघांना पोलिसांनी अटक केली आहे.












