न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ जून २०२३) :- पिंपरी चिंचवड शहरात स्पा च्या नावाखाली काही दलाल स्वतःच्या आर्थिक फायदयासाठी अवैधरित्या मुलींना जास्त पैशाचे अमिष दाखवून वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडत आहेत. याबाबत अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंधक कक्ष विभाग, गुन्हे शाखेकडील पोलीस अधिकारी व अंमलदार यांना माहिती मिळाली.
पोलिसांनी (दि. १५) रोजी रहाटणी परिसरातील APPLE SPA, रेनबो प्लाझा, रहाटणी या ठिकाणी सापळा रचुन बनावट ग्राहकाला पाठविले. अचानकपणे छापा टाकुन महिला आरोपी व रोहन विलास समुद्रे, पिंपरी यांच्या ताब्यातून दोन पिडीत मुलींची वेश्या व्यवसायातून सुटका केली. दोन्ही आरोपी विरुध्द वाकड पोलीस स्टेशन ५७५/२०२३ अनैतिक व्यापार (प्रतिबंध) अधिनियम १९५६ चे कलम ३,४,५ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास वाकड पोलीस स्टेशन करीत आहेत.
सदरची कारवाई पोलीस आयुक्त, विनय कुमार चौबे, पोलीस सह आयुक्त डॉ. संजय शिंदे, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उप-आयुक्त (गुन्हे) स्वप्ना गोरे, सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे) सतीश माने यांच्या मार्गदर्शनाखाली अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंधक कक्षातील पोलीस निरीक्षक देवेंद्र चव्हाण, पोउपनि प्रदिपसिंग सिसोदे, पोलीस अमलदार, सुनिल शिरसाट, सुधा टोके, भगवंता गुठे, मारुती करचुंडे, गणेश कारोटे, वैष्णवी गावडे, संगीता जाधव, रेश्मा झावरे, सोनाली माने यांनी केली आहे.












