न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ जून २०२३) :- मोहननगर, चिंचवड येथील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले संस्थेच्या मातोश्री ताराबाई भिमाजी निंबारकर पूर्व प्राथमिक विद्यालय, सौ. जयश्री दिलीप निंबारकर प्राथमिक विद्यालय, सरकारमान्य माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांना राजमाता जिजामाता पुण्यतिथी निमित्त हर्षमय सोसायटीतील सदस्यांच्या वतीने शालेय व्हा वाटप करण्यात आले.
यावेळी विद्यालयातील २५० विद्यार्थ्यांना इयत्तानुसार एकरेघी, दुरेघी, चाररेघी, चौकटी पुलस्केप वह्यांचे वाटप सोसायटीतील उपस्थित सदस्यांच्या हस्ते झाले. संस्थेचे संस्थापक, कार्यवाह प्रा. अँड. दिलीप निंबारकर सर यांनी या सामाजिक उपक्रमाचे स्वागत केले व भविष्यातील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. संस्थेच्या अध्यक्षा सौ. जयश्री निंबारकर मॅडम यांनी सर्व सदस्यांचे स्वागत केले व आभार मानले.
या कार्यक्रमामध्ये मोहिनी मित्तल, सिंधू चिंचकर, संगिता भोसले, प्रिया जगताप वर्षा साबळे, दिपाली भाँगे, प्रतिभा क्षीरसागर, प्रतिक्षा काकडे, नेहा सरोदे, दिपिका पवार, शितल आश्रितकर, शुभांगी पालमपुरे, मयुरेश पाटील व प्रविण पाटील सहभागी झाले होते.
उपशिक्षक गजानन शिंदे यांनी राजामाता जिजाऊ यांची माहिती विद्यार्थ्यांना दिली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन गणेश वाळुंज सर यांनी केले.















