न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ जून २०२३) :- ” तु आमच्या घरावर दगड का मारला ” अशी फिर्यादीने आरोपीला विचारणा केली. त्यावरुन चिडुन जावुन आरोपीने फिर्यादीला शिवीगाळ करीत हाताने मारहाण केली. फिर्यादीच्या उजव्या कानाला चावुन कानाची पाळी तोडुन त्यांना जखमी केले, असे फिर्यादीत म्हटले आहे.
हा प्रकार (दि. १७) रोजी रात्री ११.३० वाजता मोरया पार्क गल्ली, पिंपळे गुरव येथे घडला. फिर्यादी अभिजीत उमाकांत शिंदे (रा. पिंपळे गुरव) यांनी आरोपी नामदेव दसरथ सांळुके याच्या विरोधात फिर्याद दिली आहे. सांगवी पोलिसांनी आरोपीच्या विरोधात २८४ / २०२३ भादवी कलम ३२५,३२३,५०४ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.















