- निगडीतून पोलीस अधिकाऱ्यासह दोघांना अटक…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ जून २०२३) :- निगडी पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल न करण्यासाठी तक्रारदार महिलेला दीड लाखांची खंडणी मागीतली. पैसे घेण्यासाठी पोलीस अधिकाऱ्याचा हस्तक निगडी-प्राधिकरणात तक्रारदार महिलेच्या घरी गेला. दीड लाखाची लाच महिलेकडून स्वीकारताना एसीबीने त्याला ताब्यात घेतले.
तक्रारदार महिलेने त्यांच्या ओळखीच्या व्यक्तीस बँकेमधुन कर्ज काढून पैसे दिले होते. या कर्जाचे हप्ते न भरल्यामुळे तक्रारदार यांनी उसने पैसे दिलेल्या ओळखीच्या व्यक्तीकडे दिलेल्या पैशाची मागणी केली. त्यावर त्यांनी पैसे दिलेल्या महिलेविरुद्धच खंडणीची तक्रार निगडी पोलीस ठाण्यात दिली. त्याची चौकशी एपीआय कोरडेंकडे होती. त्यात त्यांनी व एकाने या महिलेविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल न करण्यासाठी दीड लाख रुपये मागितले.
सुदेश शिवाजी नवले (वय 43 वर्ष, रा. वाल्हेकरवाडी, चिंचवड) असे पोलीसांच्या हस्तकाचे नाव आहे. त्याने निगडी पोलीस ठाण्यातील एपीआय अमोल प्रकाश कोरडे, पोलीस शिपाई सागर तुकाराम शेळके यांच्यासाठी त्यांच्या मागणीवरून ही लाच घेतली. या तिघांनाही एसीबीने ताब्यात घेतले आहे. पुणे एसीबी युनिटचे ही कारवाई केली.















