न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ जून २०२३) :- पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालीत असताना पोलिसांना काही लोक आपसात भांडण करत असल्याचे निदर्शनास आले. फिर्यादी पोलीस अधिकारी हे त्यांचे आपसातील भांडण सोडवत असताना आरोपी यांनी सरकारी कामात अडथळा निर्माण केला. फिर्यादीला धक्काबुक्की केली. त्यामध्ये फिर्यादी यांचे शर्टचे आणि शोल्डर पट्टीचे बटन तुटले, असे फिर्यादीत नमूद आहे.
हा प्रकार (दि. १७) रोजी १०.३० वाजताच्या सुमारास स्मिता चायनीज जवळ, छत्रपती शिवाजी महाराज चौक, तळेगाव दाभाडे स्टेशनजवळ घडला. याप्रकरणी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्याचे पोलीस उप निरीक्षकांनी आरोपी दिनेष कसरत प्रधान, सरोज जगन्नाथ माझी, राजु बिसंभर प्रधान (सर्व रा. तळेगाव दाभाडे, मुळ गाव-झारखंड) यांच्या विरोधात फिर्याद नोंदविली आहे.
तळेगाव दाभाडे पोलिसांनी २७३/२०२३ भा.द.वि. कलम ३५३,३२३,३४ प्रमाणे गुन्हा दाखल करीत आरोपींना अटक केली आहे.















