न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ जून २०२३) :- विवाहितेचा वारंवार शारिरीक व मानसिक छळ करुन आरोपी पती, सासु, सासरे यांनी हाताने मारहाण व शिवीगाळ केली. लग्नामध्ये मानपान केला नाही, अंगावर सोने नाणे घातले नाही व तुझ्या घरच्यांनी लग्नात हुंडा दिला नाही, असे आरोपी फिर्यादीच्या मुलीला वारंवार म्हणत होते.
सतत हुंडयाची मागणी करत होते. त्यामुळे फिर्यादीने आरोपीला दुचाकी घेऊन दिली होती. तरी देखील आरोपींनी तीचा छळ करणे सोडले नाही. त्यामुळे आरोपींच्या जाचाला कंटाळुन फिर्यादीच्या मुलीने तिच्या राहते घरी गळफास घेवुन आत्महत्या केली. तिला आत्महत्या करण्यास आरोपींनी प्रवृत्त केले, असे फिर्यादीत म्हटले आहे.
ही घटना (जुन २०११ ते ११/०६/२०२३ पर्यंत रामनगर, चिंचवड) येथे घडली. महिला फिर्यादीने आरोपी अमित विलास चांदगुडे, महिला आरोपी, विलास मधुकर चांदगुडे यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे. पिंपरी पोलिसांनी ६४८/२०२३ भादंवि कलम ३०६.४९८ (अ).३२३, ५०४,३४ नुसार आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे.















