न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ जून २०२३) :- मोबाईलवरून फोन करून आरोपीने फिर्यादीला ” तुम्ही तुमच्या पगाराव्यतीरिक्त घरी बसल्या रिकाम्या वेळी काही पैसे कमावु शकतात”, असे सांगितले. यु-टुब वरील व्हिडीओ लाईक्स करण्यास सांगुन १५० रुपये फिर्यादीला परत करीत फिर्यादीचा विश्वास संपादन केला.
त्यानंतर फिर्यादीच्या मोबाईल आणि टेलीग्राम अॅपवर nasdaq inr sites.pages.dev अशी लिंक पाठवली. त्यामध्ये फिर्यादीचे अकाउंट तयार करुन ट्रेडींगसाठी पैसे भरण्यास सांगुन फिर्यादीकडुन वेगवेगळया लिंकद्वारे वेगवेगळया अकाउंटमधून एकुण १६,८४,००० रुपये घेऊन त्यांची ऑनलाईन आर्थिक फसवणुक केली आहे. ही घटना (दि. ११/०४/२०२३ रोजी दुपारी २.०० वाजता त्यांचे ऑफिस टि.सी.एस कंपनी, हिंजवडी फेज-३ या ठिकाणी आणि (दि. १४/०४/२०२३) दरम्यान फिर्यादी यांच्या मोबाईलवर व्हॉटसप मेसेजद्वारे घडली.
फिर्यादी विश्वजीत कुमार उपेंद्र झा (रा. पुनावळे) यांनी आरोपी मोबाईल नंबरवरील अज्ञात इसम (पुर्ण नांव पत्ता माहित नाही) यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे. रावेत पोलिसांनी २३७/२०२३ भा.दं.वि. कलम ४२०, ४०६ माहिती तंत्रज्ञान अधि ६६ (ड) अन्वये आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे.















