न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ जून २०२३) :- संगणमत करून पीडीत महिलांना वेश्या व्यवसायासाठी भाग पाडुन त्यांना पैशांचे अमिष दाखवले. त्यांना वेश्या व्यवसायासाठी प्रवृत्त करुन त्यांच्याकडून वेश्या व्यवसाय करवून घेतला. आरोपींनी त्यातून मिळालेल्या रकमेतून स्वतःची उपजिवीका भागवली.
पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्ष गुन्हे शाखेने (दि. १७) रोजी सायंकाळी ६.४० च्या सुमारास बागडेवस्ती, पुणे नाशिक हायवे रोड, कुरुळी, ता. खेड जि. पुणे. येथील हॉटेलमध्ये कारवाई केली.
महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात ३३६/२०२३ भा.दं.वि. कलम ३७०, (३) ३४ सह अनैतिक व्यापारास प्रतिबंध अधिनियम १९५६ चे कलम ३,४,५ अन्वये आरोपी अजीत संजीवन लाल गौतम, पाहिजे आरोपी सुधाकर सजीवा शेट्टी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करीत एकाला ताब्यात घेतले आहे.















