न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ जून २०२३) :- अनाधिकाराने, बेकायदेशिररित्या विक्रीसाठी आरोपीने गांजा हा अंमली पदार्थ कब्जात बाळगला. हा गांजा आरोपीने एकाकडून ओडिसा राज्यातून आणला होता.
पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथक, गुन्हे शाखेने (दि. १८) रोजी दु. १२.१५ च्या सुमारास तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशनच्या हद्दीतील शंकरवाडी गाव, तळेगाव दाभाडे येथील लडकत इंडियन ऑईल पेट्रोल पंप शेजारील मोकळ्या जागेत कारवाई केली. आरोपीकडून २९ किलो १५२ ग्रॅम वजनाचा गांजा हा अंमली पदार्थ आणि १०,००० रुपये किंमतीचा मोबाईल असा एकुण ७,३८,८०० किंमतीचा ऐवज जप्त केला आहे.
तळेगाव दाभाडे पोलिसांनी २०४/२०२३ एन.डी.पी.एस. अॅक्ट कलम ८ (क), २० (ब) (आयआय) (क), २९ प्रमाणे आरोपी मनोज शंकरलाल प्रजापती (राज्य राज्यस्थान) याच्यावर गुन्हा दाखल करीत त्याला ताब्यात घेतले आहे.















