न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ जून २०२३) :- संमतीशिवाय जबरदस्तीने फिर्यादीच्या जागेत जावून जेसीबीच्या सहाय्याने पत्र्याचे कंपाऊड आरोपी यांनी पाडले. जागेवर अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केला. याबाबत फिर्यादीने हरकत घेत विचारना केली असता आरोपींनी सदरची जागा ही कुणाल मोरेश्वर भोंडवे व महेंद्र जगन्नाथ गरड यांची आहे, असे सांगितले. आम्ही आमच्या जागेत काम करीत आहोत व ते काम चालुच ठेवणार, अशी धमकी आरोपींनी फिर्यादीला दिली, असे फिर्यादीत नमूद आहे.
हा प्रकार (दि.१७) रोजी १०.३० वा ते २.३० वाजेच्या दरम्यान सर्व्हे नं ९३/३/२/२ मधील जागेत, रावेत येथे घडला आहे. फिर्यादी कांतीलाल मोतीलाल कर्नावट यांनी आरोपी अनिकेत मनोज चव्हाण, विशाल माणिक गायकवाड, कुणाल मोरेश्वर भोंडवे, महेंद्र जगन्नाथ गरड यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
रावेत पोलिसांनी २३८/२०२३भा.दं.वि. कलम ४२७, ४४७, ५०४, ५०६, ३४ अन्वये आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.















