न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० जून २०२३) :- मेट्रो ट्रेडर्स अॅन्ड टायर्स या टायर विक्रीच्या व्यवसायात भागीदारी देण्याचे आरोपीने फिर्यादी आणि त्यांच्या पतीला आमिष दाखविले. दर महिन्याला १ लाख रुपये देण्याचे तसेच एकुण व्यवसायाच्या नफ्यातुन फिर्यादी व त्यांच्या पतीला १ टक्का नफा देण्याचे कबूल केले. त्यासाठी फिर्यादी व त्यांच्या पतीकडुन एकुण १४,१३,००० रुपयांची रक्कम आरटीजीएस व एनईएफटीद्वारे दिलेल्या बँक खात्यावर आरोपीने वेळोवेळी स्वीकारली.
त्यानंतर आरोपीने फिर्यादीसह त्यांच्या पतीला टायर विक्रीच्या व्यवसायात भागिदारी अथवा करारनाम्यात ठरल्याप्रमाणे दरमहा १ लाख रुपये अगर व्यवसायात झालेल्या नफ्यापैकी १ टक्का रक्कम अप्रमाणीकपणे दिली नाही. त्यांची फसवणूक केली.
हा प्रकार (दि ५/१/२०२१ पासून ते दि. ०१/०५/२०२३ पर्यंत) शॉप नं २१. अथर्व मार्केट, जगताप डेअरी चौक, रहाटणी येथे घडला. महिला फिर्यादीने आरोपी रिझवान दिलावर मणेर (रा. थेरगाव) याच्या विरोधात फिर्याद दिली आहे. वाकड पोलिसांनी ५८४ / २०२३ भा.द.वि. कलम ४२०, ४०६ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.